रजि. नं. - जी. बी. बी. एस. डी. ३०९ / २०२१ मुंबई, महाराष्ट्र राज्य

आपले व्यासपीठ

"समृद्ध लेखणीतून रेखाटू आधुनिकेतेचा लांजा राजापूर"

       ✍🏻लेखणी म्हणजे प्रखर विचारांची शिदोरी! ही शिदोरी ग्रंथ, कांदबरी आदि साहित्यिकातून तसेच पत्रकातून आपणास रेखाटलेल्या ज्वलंत विचारांच्या प्रेरणेतून बळ देते आहे.

       “बुलंद सोच ही, आपका आवाज बुलंद करेगी” तुमच्यातील प्रखर विचार हेच ध्येयाचा किनारा गाठू शकतात. यासाठीच पुढे लेखणीची उत्पत्ती झाली. लेखणीतून संतानी पुरोगामी विचारांचा चौथरा बांधला. साहित्यिक, समाजसुधारक, क्रांतीवीरानी कळस चढवून पुढे इतिहास रचला.

       राष्ट्रहितासाठी क्रांतिकारांनी अंधश्रद्धेविरुद्ध अग्नीतील धगधगत्या निखाऱ्याप्रमाणे तर अन्यायाविरोधात ज्वलंत मशालीप्रमाणे चळवळीत लेखणी कामी आली.
अशी लेखणी पुढे समृद्ध होत गेली. अक्षरांना तेजोमय विचारांची पालवी फुटून शब्दाची वेल बनली. त्या शब्दवेलीवर काव्यांची फुले बहरुन ग्रंथरूपी फळ देणारा वृक्षच बनला अशी ही लेखणी! परंतु त्याच लेखणीच्या बाहुने आज आपण पुन्हा आपणाला मातृभूमीची आठवण करून दिलीय.

       दुरावस्थेत असलेल्या लांजा – राजापूरातील रुग्णालये तसेच आरोग्यातील सुविधांच्या गैरसोयींमुळे भयावह वातावरण निर्माण झाले आहे. बहुधा अव्यवस्थेपायी प्राणाला मुकावे लागते. सदर पार्श्वभूमी आणि लोकभावना लक्षात घेता अव्यवस्थेविरुद्ध आज एकात्मतेतून पुकार देण्याची गरज आहे. यासाठीच आपल्यातील समृद्ध लेखणीची ताकद हवी आहे.

       चला तर आम्ही “मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा – राजापूर” ही सामाजिक संघटना आरोग्य विषयावर गेली अडीच वर्षे पाठपुरावा करीत आहे. याच विषयाची पोल-खोल म्हणून “समृद्ध लेखणी;आरोग्या सुविधांवर बोलू काही….” या संकल्पनेवर आधारित लेखमाला चालू करण्यात येत आहे. यात आपला सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. कारण आरोग्य विषय हा तालुकावासियांचा अत्यंत संवेदनशील विषय असल्याचे शासन आणि प्रशासनाच्या निदर्शनात आणून देण्याचा हा प्रयत्न आहे.

       आपल्या समृद्ध लेखणीतून आरोग्य विषयाच्या आशयाचा लेख आम्हाला खालील दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर पाठवून या चळवळीत सहभागी व्हा!

  1. अजय मांडवकर         – 8655114496         
  2. विनोद चव्हाण          – 9967684794      
  3. बलराम तांबे             – 9004058686       
  4. संचिता खानविलकर    – 9561299821

          संपर्क प्रमुख (राजापूर)

     श्री. रवि गितये 9664161807

          संपर्क प्रमुख (लांजा)
     श्री. प्रकाश भगते 9870506132

टीप:
१)लेख हा १०० ते १५० शब्दांचा असावा.
२)लांजा राजापुरातील आरोग्य विषयास अनुसरुन असावा.
३)आरोग्यातील पार्श्वभूमी आणि वस्तुस्थिती
४)दुरावस्था सादर करणे;सक्षम आरोग्य सुविधा मिळविण्यास उपाय योजना.
५)आपली थोडक्यात माहिती आणि पासपोर्ट फ़ोटो देणे

सूचना: आपला लेख तपासून घेऊनच आमच्या mpvs.co.in या अधिकृत वेब साईटवर “आपले व्यासपीठ” मध्ये प्रदर्शित केला जाईल.
==================================

आपले व्यासपीठ :

i)लेखमाला; आरोग्य सुविधांवर बोलू काही…..
ii)आपला कट्टा; स्वयंपूर्ण लांजा-राजापूरच्या विकासावर बोलू काही…
iii)विचारधारा;मी लोकप्रतिनिधी / प्रशासकीय अधिकारी झालो तर…
iv)पुरोगामी महाराष्ट्राची संस्कृती आणि सामाजिक वैचारिकतेतील आजचा तरुण

अधिक माहितीसाठी संपर्क : श्री. अजय मांडवकर ८६५५११४४९६

आपले नम्र,

मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर