श्री. विजय भगते
MPVS संस्थापक
"बदल पाहिजे तर तो स्वतः मध्ये पहिला करा, तरच बदल होईल."
प्रिय बंधू आणि भगिनींनो,
संप्रेमपूर्वक नमस्कार वि. वि.!
लहानपणी ओढ असते ती मामाच्या गावाला जाण्याची!! मामाकडे माझे लहानपण गेले. त्या गोड आठवणीसाठी समस्त मामा, मामी व सर्वांसाठी एक आठवणींचे स्मारक बांधावे याभावनेतुन “मुचकुंदी नदीवर पूल बांधावा” हे डोक्यात आले. नुसते पुतळे बांधण्यापेक्षा समाजापयोगी वास्तू बांधून त्याला स्मारक रूपात जपावे हा विचार! पण, हे करत असताना मी पाहत होतो, गावातील लोक एकजूट व संघटित होऊन काम करताना दिसत नव्हते. मुंबईच्या माणसाला वेळ कुठे असतो तोच मला असेल.. पण, सर्वप्रथम सुरवात करायला पाहिजे. आपल्या लोकांसाठी वेळ काढावा लागेल. हे नक्की झाले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरवात झाली ती मुचकुंदी परिसर विकास संघाची.
विचार पटत गेले आणि हा. हा. म्हणता १० ते १५ गावाचे सकारात्मक दृष्टीने विचार करणारे तरुण मुले, माणसे एकत्र आली आणि कामाला सुरुवात झाली. माणसाच्या मूलभुत गरजा अन्न, वस्त्र, निवारा जरी आपण बऱ्या प्रमाणात साध्य करू शकलो तरी आज नवीन गरजा निर्माण झाल्या आहेत. रोजगार, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, संघटन आणि आपल्या मराठी लोकांचे अस्तित्व टिकवण्याची. आज आपण मस्त जगात आहोंत पण, उद्या चे काय? आपल्या मुलांबाळांचे काय? वेगवेगळ्या बाजूने व शांतपणे विचार केला तर फार भयाव स्थिती पुढे दिसत आहे. लांजा, ओणी, राजापूर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की येणाऱ्या परप्रातीयांचा लोंढा. आज आपला माणूस भूमीहीन होऊन बसल्याचे दिसून आले. यावरून आपल्या लक्षात येत असेलच. अहो, साधे बाळंतपण, शत्रक्रियासाठी रत्नागिरी आणि मुंबईला जावे लागते. लांजा व राजापूर मध्ये अंदाजे ३५९ गावे आहेत. एवढी गावे असताना मग असे का? शिक्षणाची पण तीच बोंब. लांजा राजापूरचा फार मोठा इतिहास आहे. अनेक ऐतिहासिक वास्तू येथे आहेत. पण त्याचे जातंन होतंय का? पर्यटनात अजून पाहिजे तेवढी प्रगती नाही. एक दिवस पर्यटन होय शकते. त्याचा नक्कीच सर्वाना फायदा होऊ शकतो. पण याचा फायदा आपण घेत नाही आहोत..
आपण गट, तट, वाडीच्या बाहेर पडायला पाहत नाही. काळाची गरज ओळखून आपण इतर गोष्टीलाही महत्त्व द्यावे निदान गाव एकत्र झाला तर विकास दूर नाही. पण तसे होताना दिसत नाही. एकाच गावात राजकीय पक्ष फार वाढलेत याचा परिणाम आपण अधिक जवळून पाहिलाही असेल. आता आपणास आपल्यालासाठी व आपल्या भावी पिढीसाठी एकात्मतेच्या तत्वावर संघटित होणे गरजेचे आहे. सहकार क्षेत्र वाढवले पाहिजे, लांजा-राजापूर विकसित व संपन्न ठेवायचा असेल तर आम्ही एक पाहुल स्वतः टाकल आहे. कोणलाही विरोध न करता, नवीन रस्ता बनवून संघटित होऊन योग्यतेची कास धरली पाहिजे. मग विकास दूर नाही.
मी एक विचार मांडला आहे बाकी आपल्या सर्वांच्या सहभागावर सर्व अवलंबून आहे आणि चांगल्या गोष्टी सारख्या सारख्या होत नाहीत. विकास नुसते रस्ते बांधून होणार नाही. विकासक म्हणजे विचार ! आज बरेच देश महासता होऊ पाहत आहे आणि आपल्या भारतापुढे कधीच गेलेली आहे. त्याचे कारण त्यानी स्वतःमध्ये निर्माण केलेली विकसित शक्ती. आपल्याकडे ती ताकद आहे, फक्त ती जागृत करूया.
श्री. विजय तुकाराम भगते
अध्यक्ष
संघटनात्मक बांधणी करताना:-
सदर संस्था मुख्यत्वे करून समाजात शैक्षणिक, सामाजिक, वैदयकिय, सांस्कृतिक कला, क्रिडा, धर्मादायी विकास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे. गावाचा/ शहराचा सर्वांगीण विकास व्हावा करून समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता लोक सहभागातून राबविणे.
संघटनेचे स्वप्न (Vision)
लांजा राजापूरचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या सर्वांगीण विकास.
संघटनेचे धोरण (Mission)
सर्वसामान्य जनतेला संघटीत करून त्यांच्यामध्ये सामाजिक ऐक्याची, आपलेपणाची समानतेची, बंधुत्वाची, राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत करून सर्वांगीण विकास करणे.
संघटनेचा उद्देश (Objectives)
- शासकीय योजना प्रचार, प्रसार करणे आणि त्या राभवणे.
- आपले हक्क आणि गरजा मिळवण्यासाठी काम करणे.
- समाजाच्या सांस्कृतिक विकासाकरिता लोककला, लोकसंगीत, लोकनृत्य व पारंपारिक नृत्य, पारंपारिक खेळ, खेळाच्या विकासाकरिता व कलेच्या विकासाकरिता प्रोत्साहनपर कार्यक्रम, उपक्रम, प्रशिक्षण, मेळावे, स्पर्धा, महोत्सवाचे आयोजन करणे. समाजातील धेर्यवान, कर्तबगार, निस्पह, राजकीय, सामाजिक, पत्रकार विविध क्षेत्रातील नामवंत गुणवंतांना संस्थेमार्फत पुरस्कार व गौरव चिन्ह देऊन सन्मानित करणे.
- समाजातील व्यक्तीचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन आरोग्य शिबिरे, मेळावे, चर्चासत्र, प्रशिक्षण, कार्यक्रम, जनजागृतीपर उपक्रमाचे आयोजन करणे.
- शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणे.
- सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला क्रीडा क्षेत्रात्र गौरवास्पद कामगिरी केल्याबद्दल संबधित कर्तबगार नागरिकांचा सन्मान व सत्कार करणे.
- शासकीय योजनांची युवकांना माहिती व मार्गदर्शन करून निरनिराळ्या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याच्या सुविधा व्यवसाय उपलब्ध करून देणे . सुशिक्षित बेकार युवकांना शिबिराव्दारे मार्गदर्शन करणे व व्यावसायिक शेतीविषयक मार्गदर्शन करणे .
- समाजातील अनिष्ट चालीरीती, अनिष्ट रूढी – परंपरा बंद करणे. त्याकरिता निरनिराळे उपक्रम राबविणे. गावातील / शहरातील असलेल्या पुरातन वास्तू /वस्तू, देवळे, किल्ले, घरे याचे जतन, संवर्धन करणे. निसर्गाबद्दल लोकांना आकर्षण वाढावे म्हणून विविध जुन्या व नविन पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी उपाय योजना करणे.