आम्ही एक स्वप्न पाहतो आहे…
कोकण म्हणजे लांजा राजापूरचं असावे. बाकी सर्वाना मागे टाकावे
पर्यटनात अव्वल असावे,रोजगार तर स्वयंपूर्ण करावे
एकजुटीने लांजा–राजापूर बदलून टाकावे.
आम्ही एक स्वप्न पाहतो आहे…
स्वराज्याची आठवण यावी, कुबेराची जागा बनावी,
रावणाच्या लंकेची उपमा आमच्याकडे पाहून असावी
संस्कृती जपताना जगाच्या स्पर्धेचे भान असावे.
आम्ही एक स्वप्न पाहतो आहे…
जात–धर्म–पंथ राजकारण सोडून संघटित राहावे नवीन विचार करावे.
देव माणसात पाहावे जगी त्यासी बहूमत घ्यावे.
श्रेय,वाद,मोठेपण,अहंकार सोडून सहकार तत्व रुजवावे.
आम्ही एक स्वप्न पाहतो आहे…
परप्रांतीय परक्याला दोष का देत बसावे, व्यापाराकरिता सिहगर्जना करून सांगावे
वेळ आली आहे, वेळ जाईल त्याची घाई आहे.
लांजा राजापूर आपले आहे, आपलेच राहिल याची खात्री आहे.
आम्ही एक स्वप्न पाहतो आहे…
आम्ही डोळे उघडून स्वप्न पाहत आहे, तुम्हा आम्हा ते करता येणे कठीण नाही आहे
फक्त संघटित होऊन लढता यायला साथ हवी आहे.
आम्ही त्याची सुरुवात केली आहे, आपली साथ मात्र हवी आहे.