कु. प्रतिक्षा चव्हाण
गाव : कळसवली, तालुका : राजापूर
आज मी तुम्हाला सांगणार आहे ते मी प्रत्यक्षरित्या सामाजिक संघटनेत वावरताना घेतलेले अनुभव आणि संघटनेच्या माध्यमातून माझ्या आयुष्यात झालेले बदल…..
मी mpvs मध्ये कशी आली ?
मुचकुंदि परिसर विभाग संघ लांजा राजापूर या बदल मी नेहमी ऐकुन होते माझ्या एका मित्राकडून तो सर्व सांगत असायचा mpvs म्हणजे काय आहे तिथे काही केले जाते.
हे सर्व त्याचा कडून ऐकल्यावर नकळतच मनात वाटले की हा येवढे सांगत आहे तर आपण स्वतः जाऊन पाहिले पाहिजे नक्की आहे तरी काय असे .
मला कसे समजले नक्की काय आहे ?
27 जानेवारी 2019, रोजी संघटनेच्या माध्यमातून महिलांचा हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता आणि त्या दिवशी मी पहिल्यांदा सामाजिक कार्यक्रम उपस्थित राहिले होते. त्या कार्यक्रमात सहभागी असलेल्या प्रत्येक सभासदाच्या वागण्यातील ते सामजिक बांधिलकी बद्दल असणारे प्रेम संघटनेचे अध्यक्ष विजय भगते यांनी थोक्यात केलेले भाषण त्या भाषणामध्ये ती एकच ओळ मनाला भिडून गेली होती ( शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य संस्थापक केले कारण त्याच्या पाटीशी खंबीर पणे जिजाऊ उभ्या होत्या तसेच साथ तुम्ही सर्व महिलांनी आम्हाला द्या भविष्यात आपल्या लांजा राजापूर तालुक्यात खूप चांगला कायापालट झालेला असेल)
तिथे माझा मित्र सोडला तर बाकी कोणीच ओळखीच नव्हते तरी ही क्षणात सर्वांना आपण आधी पासूनच ओळखत आहोत असे वाटले होते कारण सर्व जन खूप आपुलकीने विचारपूस एकमेकाची करत होते .
मला का वाटले या संघटनेत आपण राहिले पाहिजे ?
त्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात सहभागी असलेल्या प्रत्येक महिलेला पुढे येऊन बोलायची संधी दिली होती बहुधा सामाजिक कार्यक्रमात सर्वांना बोलायची संधी दिली जात नाही फक्त मान्यवर व्यक्ती च बोलतात पण इथे तर असे काहीच नाही आहे .त्याच वेळी मनात एक जाणीव झाली की ही संघटना म्हणजे आपल्याच माणसासाठी बनवलेले एक व्यासपीठ आहे आपण जर या सर्वांन सोबत वावरलो तर खरच मी पण समाजात एक नवीन ओळख निर्माण करू शकते .असा विश्वास पहिलाच कार्यक्रमात मला आला.
ओळख स्वतः ची आणि झालेले बदल
मी गेली एक वर्ष या संघटनेत वावरत आहे इथे वावरत असताना मला अनेक उच्च शिक्षित मार्गदर्शन करते लाभले , बलराम तांबे,सुजय गितये,महेश मांडवकर,अजय मांडवकर, किरण भालेकर,अमोल पळसमकर, तसेच संघटनेचे अध्यक्ष विजय भगते साहेब या सर्वांनी वेळोवेळ मार्गदर्शन केले,आणि अजुन ही सर्वच जसा वेळ असेल तसे
मार्गदर्शन करतातच. काही महिने मला महिला सचिव हे पद दिले होते आणि हे काम माझ्यासाठी तर एकदमच नवीन होते तरी जो मनात आत्मविश्र्वास लागतो तो या सर्वांनी मला दिला होता आणि सचिव हे काम करत असताना प्रत्येक सभेचं अहवाल सादर लेखी स्वरूपात करत असताना मला माझ्या मधील लेख लीह्याची कला उमगली आणि मग मी प्रयत्न करायला सुरवात केली , मी जे काही आज लिहत आहे याचे सारे श्रेय मला लाभलेल्या संघटनेतील प्रत्येक मार्गदर्शन करण्याला जाते त्यांनी जर वेळीच मला प्रोहत्सान दिले म्हणून मला माझी कला उमगली.
हे सर्व सांगायचे तात्पर्य येवढं की देवाने माणसाला घडवताना प्रत्येक मनूष्याकडे असा एक कोणता ना कोणता तरी गुण दिलेला असतोच मग कोणाला चित्र रांगोळी ऍक्ट्टीन, खेळ , लेखन, तर कोणचा आवाज छान असतो काहींनी गायला आवडते पण ही आवड स्वतःपूर्ती मर्यादित असते पण का कधी प्रश्न केला मनाला नाही ना.
आपल्या या कलागुणांना प्रोत्साहन देऊन एक नवीन ओळख बनवण्याची संधी आहे तुमचा कडे आणि त्या साठीच तर संघटनेच्या माध्यमातून एक व्यासपीठ मिळवून दिले आहे. इथे येऊन माझी नवीन ओळख निर्माण केली तसेच माझे आपल्या लांजा राजापूर तालुक्यातील प्रत्येक तरुण पिढीला नव्हे तर प्रत्येक नागरिकाला आहवान आहे
आपण जर सर्व एकत्र आलो आणि मिळालेल्या व्यासपीठाचा उपयोग करून घेतला तर भविष्यात अनेक नवीन हिरे घडलेले दिसतील आपण जेव्हा आपली एक नवीन ओळख निर्माण करून समाजात वावरतो ना तेव्हा मनाला एक वेळच समाधान मिळते .
आज पर्यंत संघटनेने खूप काम केली आहेत हे तर सर्वजण जाणून आहेत सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या सध्याच्या परिस्थितीत मूलभूत गरजा म्हणजे आरोग्य शिक्षण रोजगार
या सर्व बाबी विचारात घेऊन संघटना काम करतच आहे आणि त्यांहून पुढे म्हणजे आपल्या सर्व कामाचा आडवा आयटी टीम अतिशय उत्तम रित्या करत आहे.
आजपर्यंत राबवलेल्या उपक्रमाची सविस्तर माहिती
https://www.mpvs.co.in/ या mpvs च्या वेबसाईट उपलब्ध आहे
शेवटी मी हेच सांगेन स्वतः मधल्या कलागुणांना ओळखायला शिका ….प्रोत्साहन द्यायला सज्ज आहे आपलेच mpvs च व्यासपीठ…
सकारात्मक विचारांना कशाचीच तोड नसते …त्यातून नेहमीच चांगले घडते….