
कु. स्वप्निल शांताराम गितये
मु. पो. वडदहसोळ गितये वाडी
ता. राजापूर, जि. रत्नागिरी
अजून आठवतय ! मी शाळेत असताना पहिला तास सुरू होण्याच्या अगोदर आम्हला हात जोडून ‘शुभंकरोती’ म्हणावयास लावायचे. यातही आरोग्याला पहिला क्रम दिला आहे. माणसाला आयुष्यात मिळणारा पैसा, प्रतिष्ठा, दौलत, पद इत्यादी सर्व नंतर. त्याआधी आरोग्यला महत्व का? समजलच नाही. परंतु शालेय जीवन संपल्यावर समजात वावरताना आरोग्याचं खरं महत्व समजत. शिवकालात वारंवार मोगलांच्या स्वाऱ्या व संकट आणि साथीचे रोग यावर उपाय म्हणून संत रामदासांनी गावोगावी तालीम उभारल्या व मारुती मंदिर निर्माण केली. त्यामुळे अशा तालिमीन मधून आपल्या महाराजांना शूरवीर व निरोगी साथीदार व मावळे भेटले व स्वराज्य तोरण बांधण्यात खूप मदत झाली.
जर आपल्याला बाळ वयात शाळेत व आपला इतिहासात आरोग्यच एवढं महत्व सांगितलं जातं असताना आपण आरोग्य च्या बाबतीत एवढं निष्काळजी का राहायचं? आपल्या कोकणच्या पारंपरिक नमनांमध्ये स्त्री व पुरुष हे शिव आणि शक्ती प्रतीक आहे अस सांगण्यात येत. स्त्री सहनशीलतेचे प्रतीक आहे हे खरं आहे परंतु असे म्हणतात, की एक हाड मोडण्याच्या वेदना जेवढ्या असह्य असतात. तेवढ्या एकाच वेळी २० हाडे मोडल्यावर जेवढ्या वेदना होतील, तेवढ्या वेदना ही एक स्त्री नॉर्मल प्रसुतीमध्ये सहन करत असते. ह्या सर्व वेळात तिचा जीव धोक्यात असतो व
वेदना ही असह्य असतात त्यासाठी गावं पातळीवर एखाद सक्षम प्रसूती गृह असणे गरजेचे असते. परंतु शहरी भाग वगळून ग्रामीण भागात या सुविधा सक्षम नाहीत. म्हणजे आपण सुरक्षित आहोत का?
मुलभूत गरज म्हणून आज आरोग्य हा विषय जिव्हाळ्याचा होऊन बसला असला तरी आम्ही मात्र अजून त्याच पारतंत्र्यात.
लांजा-राजापूरमधील प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये वारंवार सुविधांचा अभाव आढळला असला तरी बळकटीकरणांसाठी सरकार अजून प्रतीक्षेत का? परिणामी, काहीजणानी सुविधाअभावी यमयातना देखील भोगल्या आहेत. आरोग्यसेवेअंतर्गत दिला गेलेला हक्क आज सर्वसामान्यांना खरच लाभतोय का? यावर सरकारने डोळसपणे लक्ष्य केंद्रित करणे गरजेचे आहे. अपुर्या सुविधासाठी सरकार दरबारी पाठपुरावा आणि मुलभूत हक्काची जाणीव जनजागृतीतून व्हावी यासाठी “मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर” या सामाजिक संघटनेने आरोग्यविषयक चळवळ उभारली आहे. यात सर्वांनी सहभाग घेऊन आपण आपल्या आरोग्यातील हक्काची मागणी सरकार पुढे केली पाहिजे.
धन्यवाद!