राजापूर-साखरपा रस्त्यावर लांजा तालुक्यामधे भांबेड गावापासून १२ किमीअंतरावर एका निसर्गरम्य ठिकाणी लघु पाटबंधारे विभागाने हे मातीचं धरण बांधलं आहे. सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या या धरणाला दरवाजे नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात पायऱ्यांवरून एका संथ लयीत पडणाऱ्या धबधब्याच्या असंख्य शुभ्र जलधारा बघणं हा कधीही विसरता न येणारा अनुभव असतो. सांडव्याच्याकडेने वर धरणाच्या भिंतीवर पोहोचलं की समोर दिसणारं दृश्य स्तिमित करतं. धुक्याने वेढलेल्या सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगा आणि सौंदर्याने ओथंबलेल्या इथल्या निसर्गाचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात