भूमी सांगे मेघा ला नको आता जास्त तडपवू !
कसे सांग बरे मी तुझा हा विरह आता सहन करू !
तुझ्या अमृत धारा तृप्त करतात माझ्या मना !
बरसणारे तुझे जल देई जीवनदान माझ्या तना !
खूप सारे इथे माझे पण तुझ्या सारखे नाहीच कोणी !
पण तुझ्या उशीरा येण्याने नाराज होणे मज आता सहन न होई !
जेव्हा तू येतोस मी तुलाच बिलगून नाही का असते !
तुझ्या धारेचा कण ना कण माझ्यामध्ये झिरपून घेते !
भीती असते सदा भरवसा तुझ्या बरसण्याचा कधीच नसतो !
लागलीच मला तुला जपून ठेवण्याचा मग मात्र विसरच होतो !
मग कधीतरी तुला माझी अचानक आठवण येते !
आणि तुझी स्वारी सारे बंध तोडून लागलीच अवतरते !
सांगू कसे तुला मला ही तूच हवाच आहेस जरी !
तरि पण मी नाही करू शकत तुझे स्वागत तेव्हा असे सत्वरी !
मी ही आहे खूप साऱ्यांची जननी, पोशिंदे जे विश्वाचे !
कसे सोडू मी त्या सगळ्यांना दुःखी कष्टी, नुकसान त्यांचे बहुमोलाचे !
रागावून मग तू निघून जातो, खूप वेळ लागतो तुला मनवायला
कधी समजेल तुला माझी व्यथा, माझा वेळ नेहमीच खर्ची होतो कोप साऱ्यांचा निवारायला !
करू नकोस असे मी ही इथे आहे एकटी बिचारी
सदा अडकते मी पाशा मध्ये सगळ्या, भारी ओझी डोक्यावरी !
माझ्या बरोबर असंख्य जीव माझ्यावर त्यांचे जीवन
तूही च तर आहेस की त्यांना जल देणारा, दिव्य तुझे अतःकरण !
तुझ्या वेळेत येण्या जाण्याने सगळेच खूप होतात आनंदित !
मग मी ही अगदी खुशीत असते घेते तुला अशी ओ॑जळीत !
तुझ्या माझ्या मिलनाने सारीच सृष्टी बहरून येते, गातात पक्षी गाणी !
मनुष्य,प्राणी,गुरे वासर झाडे झुडपे, सारेच तृप्त होती पिवूनी तुझे पाणी !
सांग मला मग तुझ्या माझ्या मिलनाचा अजून काय तो वेगळा अर्थ ?
सारी सृष्टी हसरी राहावी नाहीतर आपले जीवन च नाही का रे व्यर्थ ?