रजि. नं. - जी. बी. बी. एस. डी. ३०९ / २०२१ मुंबई, महाराष्ट्र राज्य

तालुक्यातील लोकांची माहिती

तालुक्यातील लोकांची माहिती

१. खानपान : कोकणाला मोठा समुद्र किनारा व नदया-नाले असल्याने उपजीविकेसाठी मासे खाण्याचे प्रमाण जास्त आहे. तसे भात शेती हा प्रधान शेती असल्याने वरण भात, पिठी भात हे साधे व हलके खादय या लोकांच्या आहारात असते. येथे तांदूळ व दूध यापासून बरेच पदार्थ बनवले जातात व खातात. सुके मासे, आंबा, काजू व फणस इत्यादी फळांपासून पावसाळी टिकाऊ खादय हे यांच्या आहारात असते.

२. राहणे-साहण : कोंकण मुंबई जवळ किंव्हा तालुक्यातील लोक हे मुंबई मध्ये जास्त असल्याने. गावाकडील राहणीमान हे आता मुंबई सारखे होत आहे, मोठी मोठी घरे आणि अंगण या तालुक्यातील वैशिष्ट आहे. संस्कृती जपणारे ही लोक आहेत व मंदिर, देव देवता ना मानणारी माणसे आहेत. साधी राहणी पण नीटनेटकी राहणी येथे पाहायला मिळते. तसेच स्वच्छता मात्र फार कमालीची आहे. “अतिथी देवो भव” या मतांची माणसे या तालुक्यात आहेत.

३. भौगोलिक परिस्तिथी : येथे सपाट गाव फार कमी आहेत. डोंगराचे प्रमाण फार आहे. सयाद्रीच्या उतरत्या रागांतून नद्या सागराला मिळत असतात. पावसात नद्या धो धो वाहतात त्याच मे कडे खड खड्या असतात. पावसाचे प्रमाण फार आहे पण पाण्याचे नियोजन मात्र अजून पाहिजे तसे येथे पाहायला मिळत नाही.
भौगोलिक आणि नैसर्गीक संपत्ती ने हे तालुके सधन आहेत. येथील भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे आणि डोंगरउतारांवर केलेली भात शेती हे खूप मोठ्या प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त या प्रदेशाला लाभला आहे.

४. लोकसंख्या : लोकसंख्या या तालुक्यात विरळ आहे कारण करता माणूस मुंबईत आहे, त्यामुळे महिल्यांचे प्रमाण जास्त आहे. येथे हुंडाबळी नाही किभवना हुंडा ही पद्धत नाही. स्त्री पुरुष समभाव आहे. येथे कर्ज घेण्याचे प्रमाण कमी आहे त्यामुळे तसेच शासनाची थकीतचे प्रमाण फार कमी आहे. शिक्षणाच्या बाबतीत तालुके प्रगती करत आहेत. येथे विद्यार्ती, माणसे हुशार आहेत. येथे मात्र मान-पान सन्मान साठी मोठी रसीखेच चालते. लोकसंख्या कमी असल्याने बरेच घरे बंद आहेत कारण ते कामा-धंद्या निमित्त मुंबई-पुणे इत्यादी शहराकडे वसलेली आहेत पण शिमगा, गणपती व मे महिन्यात हे तालुके गजबजलेले पाहायला मिळतात.

५. अडचणी :
१) तालुक्यामध्ये आरोग्य यंत्रणा सुधारावी ही काळाची प्राथमिक गरज आहे.
२) उच्च व तंत्र शिक्षणासाठी शिक्षण यंत्रणा येथे होणे गरजेचे आहे.
३) पर्यटन डेव्हलोपमेंट होण्यासारखे आहे पण पाहिजे तसे बद्दल झालेले नाही.
४) रोजगाराची प्राथमिक गरज पूर्ण होते पण स्तलांतर थांबवण्यासाठी रोजगारावर काम करण्याचे फार गरज आहे.

* तालुक्यातील लोक फणसातील गऱ्या सारखे आहेत वरून थोढे काट्या सारखे असतील पण आतून मनाने गोड रसाळ आहेत.*