लांजा तालुका आंबा व काजूच्या बागांसाठी प्रसिध्द आहे. लांज्यात प्रवेश करताक्षणी आजूबाजूचा परिसर या बागांमुळे प्रसन्न वाटू लागतो. लांजा निसर्गरम्य सह्याद्रीच्या कुशीत वसला आहे. शहरी गजबजाटापासून दूर निसर्गाच्या हिरवाईत हरवून जाण्यासाठी या ठिकाणी जरूर यावं. लांजा तालुक्यात `माचाळ` हे इथलं नव्याने विकसित होणारं थंड हवेचं ठिकाण आहे. लांज्यापासून गणपतीपुळे, रत्नागिरी, राजापूर, मार्लेश्वर, आंबोळगड, पावस ही सारी ठिकाणं दोन तासांच्या अंतरावर असून इथे स्वतःच्या वाहनाने जाता येऊ शकतं.