शिक्षण विभाग (करियर मार्गदर्शन टीम)
श्री. वैभव भगते
प्रमुख : शिक्षण - करिअर मार्गदर्शन विभाग
श्री. संकेत गुरसळे
श्री. सचिन गोठणकर
श्री. प्रदीप धुमाळ
श्री. भगवान तळेकर
लांजा-राजापूर मधील किंभवना कोंकण बोर्ड अवल येते व सर्वच विद्यार्थी हुशार असतात. असे असताना आपल्या मुलां-मुलींचे पुढे काय होते हे आपण जाणता. मुला-मुलींना वेळेत करिअर मार्गदर्शन हवे, त्यांना हवा तो मार्ग दाखवण्यासाठी या विभागाची सुरुवात झाली. बरेच मार्गदर्शन वर शिबीर मुंबई व गावांमध्ये मोठया पध्द्ती मध्ये राभवल्या गेल्या व पुढेही राभवल्या जातील.
यात विभाग प्रमुख म्हणून श्री. वैभव भगते मो. ९९६९२३५१५० हे कार्यभार पाहतात, यांचे असे मत आहे, मुलांना प्राथमिक शिक्षणापासून पुढे करिअर मार्गदर्शन देऊन लांजा-राजापूर चे भविष्य निर्माण करता येईल. त्यासाठी सर्वांचे सहकार्याला आवाहन ते करत आहेत. शिक्षण व मुलांना योग्य मार्गदर्शन हाच गाभा या विभागाचा आहे.
उत्स्फूर्त प्रतिक्रिया
MPVS कॉरंटाईन उपक्रम
वाचाल तर वाचाल’ हे लोकप्रिय झालेले विधान नेहमी बोलले जात असले, तरी तशी कृती मात्र आचरणात येत नाही. अवांतर जाऊच द्या, पण कामाचे तेही हल्ली वाचले न गेल्याने मोठेमोठे अनर्थ घडत गेल्याचा अनुभव नित्य येत असतो. म्हणून आकलन, विचार आणि स्मरणशक्ती वृंदावण्यासाठी आपण वाचन वाढवले पाहिजेच .
तसेच जास्त वाचन असले तर आपल्याला सर्व गोष्टीची माहिती मिळते त्यातून विचार करण्यास चालना मिळते.
असे म्हणतात ना जे काही होते ते चांगल्या साठीच होते ..आपण प्रत्येक जण आपल्या आपल्या कोणत्या कारणाने आयुष्यात व्यस्त असतो .त्यामुळे मला काही हवे किवा मला काही आवडते याकडे दुर्लक्ष होते ..
पण गेल्या दोन महिन्यांपासून आपण सर्व घरीच आहोत कोरोनो मुळे आणि सर्वांकडे पुरेसा वेळ ही आहे त्यात काही तरी नवीन असे शिकता यावे या साठी मुचकुंदी परिसर विकास संघ*लांजा राजापूर या संघटनेच्या माध्यमातून प्रश्न मंजुषा हा अप्रतिम उपक्रम करिअर मार्गदर्शन टीम कढून राबवण्यात आला .३० एप्रिल ते २९ मे या कालावधीत प्रश्नमंजुषा स्पर्धा होती .या सर्व कालावधीत प्रश्नमंजुषा स्पर्धा मुळे खूप काही शिकता आले वाचन झाले काही गोष्टी होत्या ज्या आजपर्यंत माहित नव्हत्या.त्या प्रश्नाचं उत्तर शोधून कढण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणा किंवा एखादा प्रश्न नाही समजला तर त्यावर मित्र मैत्रीणी सोबत चर्चा करणे म्हणा थोडा वेळ का होईना पण वेगळीच धडपड चालू असायची.
प्रश्न मंजुषा स्पर्धामुळे जे जे विद्या्थी सहभागी होते त्यांचा वाचनाची आवड निर्माण झाली असेल तर काहींच्या जनरल नॉलेज मध्ये भर पडली असेल तर जे विद्यार्थी एमपीएससी यूपीएससी परीक्षा देत असतील त्यांचा एक प्रकारे सराव झाला असेल .पण नक्कीच प्रत्येक जन या स्पर्धतून काही ना काही १००% शिकला असणारच आहे.
Mpvs मुळे नेहमीच काही ना काही शिकायला मिळते आपल्याला आणि योग्य वेळी मार्गदर्शन टीम ने हा उपक्रम राबवला त्यामुळे सर्व करियर मागदन टीम जे मनापासून आभार .🙏.
आणि पुढे ही अशा प्रकारचे उपक्रम आपल्या टीम कढून राबवल्या तर खूप सारे नवीन हिरे आपल्या लांजा राजापूर तालुक्यातील पुढे येताना दिसतील.
आपली विश्वासू
प्रतिक्षा चव्हाण | सदस्या
कळसवली राजापूर
आपला प्रश्नमंजुषा हा उपक्रम अतिशय स्तुत्य होता. लॉक डाऊन मध्ये अनेक मंडळी आपल्या मोबाईल वरुन अनेक खेळ खेळत असताना आपल्या लांजा राजापूर वासियांना तसेच या संघटनेशी संबंधित सर्व स्पर्धकांना हा उपक्रम त्यांचे बुद्धी कौशल्य वाढविण्यासाठी दिशा दर्शविणारा ठरला, त्यामुळे माझ्यासारखे अनेक जण आपल्या या प्रश्न मंजुषेची अतिशय आतुरतेने वाट पाहत असायचो. मुचकुंदी परिसर विकास संघ ही संस्था लांजा राजापूर तालुक्यातील आरोग्य विषयक प्रश्नावर अनेक आघाड्यांवर आपला नावलौकिक उंचावत आहे. आपल्या पाठपुराव्याला आतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळत असून आपले कार्य असेच सुरू राहून एक दिवस नक्कीच आपल्या लांजा राजापूर मध्ये आरोग्याच्या दृष्टीने लागणाऱ्या सर्व उपाय योजनांची पूर्तता होईल यात शंका नाही. आपले कार्य असेच वृद्धिंगत होवो हीच ईश्र्वर चरणी प्रार्थना. आपण कार्य करीत असताना सामाजिक विचाराने कार्य करीत असता त्याचप्रमाणे आपल्या सर्व कार्य कर्त्यांचे आरोग्य सुदृढ राहो हीच प्रार्थना.
आपला हितचिंतक
श्री विकास शांताराम गितये
मु.पो. ओझर तांबळ वाडी
विलेपार्ले मुंबई
खूप छान प्रश्न होते… प्रश्नांची उत्तरे सोडवताना कधी टाइम निघून जायचा कळलेच नाही… असे अनेक शिबीर आणि स्पर्धा परीक्षा यांचे क्लासेस चालू केल्यास खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल.
अविनाश मधुकर आग्रे
प्रश्न सोडवतांना मज्जा ही आलीच त्याशिवाय ज्ञानात भरही पडली. त्यामध्ये सर्व विषयांवर लक्ष वेदले गेले. काही प्रशांनाची उत्तरे ही नेट वरून पण मिळाली तर काहींची डोक्याला चालना देत सोडवावी लागली.यामार्फत तरी आमच्या ज्ञानात थोडी भर पडली. त्यासाठी MPVS शैक्षणिक विभाग चे खूप खूप आभार. खूप काही शिकायला मिळालं.
रोहन हेमंत डोंगरकर
My experience was really good !! I get to know many things which I never studied before . Thank you to all of you who took a lot of efforts to made this questionnaire for us.
CHAITANYA SANJAY MANCHEKAR.
मला स्पर्धा परिक्षेची पूर्वतयारी कशी करावी हे समजले
मृण्मयी महेश मांडवकर
1. जनरल नाँलेज वाढले.
2.खुप छान वाटले.
Thank you mpvs and all team.
मनोहर करु दर्पे