
श्री. अनंत भिकाजी जाधव
मु. पो. शिवणे बु. बौद्ध वाडी
ता. राजापूर, जि. रत्नागिरी
अनेक वर्षापासून ग्रामीण भाग आरोग्य व ईतर सुविधापासून वंचितच आहे. आरोग्याच्या प्रश्नांबाबत आपले लक्ष वेधले असता, ग्रामीण भागातील आरोग्याच्या प्रश्नांबद्दल म्हणजे तेथील हॉस्पिटल – डॉक्टर तसेच मिळणाऱ्या सेवेच्या गैरसोयीमुळे अनेकांना आपला जीव दावणीला लावावा लागलाय. सद्यस्थिती अशीच दुरावस्था आपल्या लांजा राजापूरची आहे. मुलभूत गरज म्हणून आज “आरोग्य” हीच महत्वाची असताना त्याची सर्वसामान्य जनतेला पूर्तता होऊ नये. त्यापेक्षा वेगळे दुर्दैव ते काय? आजपर्यंत लोकप्रतिनिधी होऊन गेलेत, मताचे राजकारण केले त्याहून जास्त दिशाभूल केली, याची आपणांस जाणीव झाली पाहिजे. अनेक वर्षांपासून आरोग्याच्या सक्षामिकराणासाठी मिळणारा निधी गेला कुठे! झोपेचे सोंग घेतलेले प्रतिनिधी आणि सरकार आहेत. यांना उठवणार कोण? असा प्रश्न पडला असेल ना.
जग विज्ञानाच्या आधारे खूप पुढे गेला आहे, प्रगतीशील आहे. हे खर आहे. पण आज शहरी आणि ग्रामीण यांचा विचार केला तर ग्रामीण
भागापेक्षा सर्व बाबतीत शहरांनाच प्राधान्य देण्यात आलाय. यामुळे शहरात शहरीकरण वाढलय आणि ग्रामीण भागात गरीबीपण वाढलंय. त्यामुळे दोघांचा समतोल राखणे अत्यावश्यक आहे. स्पर्धात्मक युगात आज जलदगतीने बदल होत आहेत. मग पायाभूत सुविधांपासून दुरावलेला आमचा ग्रामीण (लांजा-राजापूर) भाग विकसित व्हावा यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज का भासतेय? याला जबाबदार म्हणून आम्ही शासनाकडेच बोट दाखवू. जर शहरात होत आहे तेच ग्रामीण भागात होणे अपेक्षित आहे. म्हणूनच शासन आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षित आणि अंधपणामुळेच आज आरोग्याच्या बाबतीत लांजा-राजापूर अंधारात आहे. रुग्णालयाची इमारत पडकी झालीय,. यंत्रांना धूळ लागून गंज चढलाय पण त्याची काळजी कुणास नाही. त्यामुळे आरोग्यातील असुविधेमुळे काहींना आपला जीव गमवावा लागतोय. ही शोकांतिका आहे. आपल्या हक्काची आणि मुलभूत अधिकाराची !
जग धावत आहे, श्वास घेण्यासाठी वेळ मिळत नाही, जो तो आपलाच विचार करतो, परंतु अशी वेळ येते तेव्हा चार पाच माणसांची गरज असते. अर्ध आयुष्य जगण्यापेक्षा पूर्ण आयुष्य जगा आणि दुसर्यांना जगवा! शिक्षण, आरोग्य, रोजगार हे जगण्याचे अविभाज्य घटक आहेत. या घटकापासून ग्रामीण भाग खूप मागे आहोत. कारण आपण संघटीत नाही. अद्यावत सुविधेसाठी मोठमोठ्या शहरात जाऊन लाभ घ्यावा लागतो. हे सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने खर्चिक आहे. ग्रामीण भागातील तरुण-तरुणी यामुळेच मागे राहिले आहेत. हे बदलणे म्हणजेच परिसराचा सर्वांगीण विकास साधला अस म्हणू शकतो.
आम्ही एकत्र आलो, तुम्ही ही एकत्र या! गगनाला नव्हे हृदयाला भिडणारा आवाज देऊया! एकजुट उभारूया! आपल्या तालुक्याच्या हितासाठी – विकासासाठी लढुया! आपण चालवलेले संघटन मुचकुंदी परिसर विकास संघ, सभासद होऊन साथ द्या.
धन्यवाद!
Avoid the use of etodolac extended release tablets in patients with a recent MI unless the benefits are expected to outweigh the risk of recurrent CV thrombotic events priligy fda approval