
श्री. राजू हरी सरवंदे
गाव : रुण, तालुका : लांजा
नमस्कार 🙏🏻
सध्यस्थितीत आपण सर्व कोरोना नावाच्या एका महाभयंकर अशा अदृश्य संकटाचा सामना करत आहोत. संकट कितीही मोठ असल तरी आपल्याला एकत्रितपणे त्याचा मुकाबला करुन विजय मिळवायचाच आहे. आपण मुंबईस्थित बांधव सध्या अनेक अडचणींना तोंड देत आहोत. गावाकडची परीस्थितीदेखील बरी आहे अस म्हणता येणार नाही.येणारा काळ कठीण असेल यात दुमत नाही. पण यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि त्यासाठी आपण एकत्र असणं, आपल्यात समन्वय असणं गरजेचे आहे. आपल्या गावातील किंवा मुंबईतील बांधवांची कोणतीही समस्या असो ती आपल्यापर्यंत पोहोचण गरजेचे आहे. आपण एकत्रितपणे समन्वय ठेऊन कोणतीही समस्या सोडवू शकतो अस मला वाटत.
मला अस वाटत की सध्याच्या परिस्थितीत मुचकुंदी परीसर विकास संघ ही आपली संघटना उत्तमरितीने काम करत आहे. आरोग्य हा विषय किती महत्वाचा आहे हे या कोरोना विरोधात लढाईने आपल्याला योग्य रीतीने समजावले आहे.
कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर आपण आपला आरोग्य विषयक लढा आणखी प्रखर करण गरजेचे आहे. लांजा राजापूर तालुकास्तरावर कार्यरत असलेली सरकारी दवाखाने , इस्पितळ अद्ययावत करण गरजेचे आहे. आपल्या संघटनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर , फिरता दवाखाना, योग्य दरात औषधोपचार देणारे डाॅक्टरांच पॅनल इ. योजना विचाराधिन असाव्यात. लांजा आणि राजापूर तालुक्यातील रुग्णांची गैरसोय, परवड थांबलीच पाहिजे असा संकल्प आपण करुया आणि संघटन मजबूत करुया अस मी सर्वांना आवाहन करतो.
सरकारी, आरोग्य विषयक सूचनांचे पालन करुया, कोरोनाला हद्दपार करूया.
आपल्या गावातील जे बांधव अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत आहेत, त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार तसेच तुमच्या कार्याला सलाम 🙏🏻
स्वतःसोबत कुटुंबाची आणि सर्वांची काळजी घ्या.
जय अचलेश्वर
🙏🏻
राजू हरी सरवंदे.