
श्री सुभाष सुरेश तांबे
मु. निवोशी तांबे वाडी
ता. लांजा, जि. रत्नागिरी
अपुऱ्या आरोग्यसेवेमुळे होतंय लांजा राजापूरवासियांचे हालहाल
आरोग्य सेवान्तर्गत शासनाने जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र महिला रुग्णालय असे वर्गीकरण केलेले आहे. त्यात रुग्णालयाच्या दर्जानुसार सेवा निर्देशित केलेल्या असतात आणि त्यानुसार सेवा दिल्या जातात. म्हणून जनतेने पहिल्यांदा संपूर्ण यंत्रणा समजून घ्यायला पाहिजे की, कोणत्या रुग्णालयात कोणकोणत्या सेवा-सुविधा उपलब्ध आहेत. पण….. माझ्या, आपल्या सर्वांच्या लांजा – राजापूरात प्राथमिक केंद्र व उपकेंद्रात आवश्यक तेवढ्या सेवा आहेत का? त्या सर्वसामान्यांना मिळताहेत का? उत्तर असेल नाही. प्रसूती विभाग चांगला नाही की नवजात दक्षता विभाग नाही. ट्रामा सेंटर नाही, ICU विभाग नाही, पुरेशे कर्मचारी नाहीत. अशी एकूण परिस्थिती. असे असंख्य प्रश्न उदभवत आहेत. याच असुविधांमुळे अनेक निष्पाप जीवांना प्राणाशी मुकावे लागते रुग्णालय असून ती
नसल्यासारखी आहेत. आपल्या विभागात अपघात झालेल्या पैकी ७० % मृत होतात ते उपचाराअभावीच. त्यामुळे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय असावं यामध्ये सर्व यंत्रणा अद्यावत असतील.
जनतेला सरकारी दवाखान्याचा खर्च कमी परंतू जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या रुग्णालयात जाण्या- येण्याचा खर्च दुप्पट होतोय. अशातच आकस्मिक काही घडले तर मग झालं… पैसा तो पैसा वर आपला जीव धोक्यात जास्त असतो अशी आपली परिस्थिती होते. त्यात डॉक्टर्स, कर्मचारी यांना राहण्याची सोय नाही. त्यामुळे नवीन भरती होऊनही कोणी फार काळ टिकत नाही. त्यावर सखोल व अभ्यासपूर्ण नियोजन करावे लागेल. परंतु तसा कठीण ही विषय नाही. पण इथे कठीण आणि गुंतागुंतीचाच सांगून दुर्लक्षित राहिला असल्याचेच दिसून येत आहे. अशातच अपुरे मनुष्यबळ तरी सेवा पुरविणार तरी कितीशा. या सर्व कारणानी सर्वसामान्य माणूस होरपळून निघतोय ! तरी.. जनता झोपलेय अन पुढारी त्यांना हवा घालायचच काम करताहेत.
या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात “अन्न, वस्त्र, निवारा ” यापेक्षा सध्या”आरोग्य” “शिक्षण” हीच महत्त्वाची गरज भासत आहे. हे जनतेने ओळखून आपल्या हक्कासाठी खडखडून उठले पाहिजे .घडणाऱ्या अव्यवस्थेवर नुसती नाराजी व्यक्त न करता त्यावर मार्ग कसा काढता येईल यासाठी सदैव प्रयत्नात राहायला हवे. एकेकाने प्रहार न करता संघटीतपणे आपला सार्वजनिक हक्क मिळविता आला पाहिजे. अधिकार नुसते गाजवण्यापेक्षा अधिकार समजून घेणे गरजेचे आहे. सर्वांच्या हितासाठी आणि भविष्य आरोग्यदायी सदृढपणे मिळविण्यासाठी हक्काची बाजू मांडावी आले. पण ती एकाने नाही तर एकीने मागू.
यासाठी शिवरायांचा इतिहास आठवा त्यांचा प्रताप आठवा! आरोग्यरुपी होणाऱ्या अन्यायावर एकजुटीने पेटून उठुया. मग ते आंदोलन असेल चळवळ असेल किंवा आपल्या लेखणीतून, प्रखर शब्दांत आपला संदेश सरकारपर्यंत पोहचवण्यास सहकार्य करूया. सरकारला अत्यावश्यक आरोग्यसेवा पुरविण्यास भाग पाडावे यासाठी आपणही प्रयत्नशील असावेत नम्रपूर्वक विनंती.
priligy 30mg price epinephrine and epinephrine racemic both decrease sedation