तळागाळातील लोकवस्तीत शोध आपल्या माणसांचा_दूरदृष्टीतून वेध घेऊ शिवरायांच्या आदर्श विचारांचा;
#MPVS संपर्क अभियान
शनिवार, २३ जानेवारी, २०२१ रोजी लांजा तालुक्यातील गवाने गावात संस्थेचे अध्यक्षश्री. विजयदादा भगते, उपाध्यक्ष गणेश खानविलकर साहेब आणि ग्रामीण कमिटी लांजाचे पदाधिकारी श्री. रविंद्र कांबळे साहेब, विजय हटकर सर यांच्या उपस्थितीत गवाणे गाव संपर्क प्रमुख पदी श्री. सत्यवान रामाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रत्येक गावात तळागाळात आपला सद्स्य आपला माणूस हवा. आपल्या हाकेला साद देणारा, एकजुटीने आणि एकविचाराने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लढा लढणारा गावाचा प्रतिनिधित्व स्वीकारणारा आपला माणूस हवा. यासाठी शोध आपल्या माणसांचा आणि शिवरायांच्या आदर्शवत विचारांचा वेध घेत संपर्क अभियान चालू केले आहे. लोकांच्या समस्या थेट कळाव्यात त्यांच्या गैरसोयी समजून घेण्यासाठी सर्वसमावेशक उद्देशाने त्या शासन दरबारी सोडविण्यासाठी “मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर संस्थेने तालुक्यात संपर्क अभियान चालू केले आहे.
गवाणे गावातील समस्त गावकरी आणि ग्रामस्थ मंडळींचा या अभियानाला भरघोस पाठींबा आणि प्रेम लाभले. त्याबद्दल त्यांचे आम्ही संस्था शतशः ऋणी आहोत.🙏🏻
#नवनिर्वाचित संपर्क प्रमुख श्री. सत्यवान रामाणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन!💐
आपले स्नेहांकीत,
#मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर