रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये निसर्ग सौन्दर्याने नटलेले, छोटेसे असे ‘खिणगिणी’ सुंदर गाव. गावाची लोकसंख्या सुमारे ७०० लोकांची आहे.
गावातील मान्यवर :
श्री. कमलाकर राऊत श्री. शिवाजी डोंगरकर श्री. मनोज कदम
श्री. प्रकाश कदम श्री. राजाराम बाने
गावातील जत्रा, उत्सव :
पौष महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ग्रामदेवता नवलादेवीचा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. त्या निमित्ताने सत्य नारायणाची महापूजेचेही आयोजन केले जाते. या गावांमध्ये सर्व शेतकरी वर्ग असल्यामुळे या उत्सवानंतरच खऱ्या अर्थाने शेतकरी शेतीच्या कामाला सुरुवात करतात.
गावातील शाळा :
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा खिणगिणी. गावात १ ली ते ७ वी पर्यंत शाळा आहे. माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी भू गावात तर महाविदयालय च शिक्षण घेण्यासाठी राजापूर ला जावे लागते.