कु. प्रतिक्षा चव्हाण
गाव : कळसवली, तालुका : राजापूर
स्वयं पूर्ण लांजा राजापूर विकासवर बोलू काही
स्वयं पूर्ण म्हणजे काय
स्वयं – स्वतःहा
पूर्ण – जे अपूर्ण नाही असे
प्रत्येक माणसला वाटत असते आपण प्रत्येक गोष्टीत स्वयं पूर्ण असावे पण ते वाटणं झाले स्वतः पुरत सगळी सुख समृद्धी मिळवण्यासाठी माणूस आयुष्य भर धडपड करत असतो . गावात शिक्षण घेऊन पुढे शहरात नोकरी करायची हेच काय ते आयुष सार्थक झालेच समाधान .
अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार या आपल्या मूलभूत गरजा आहेत हे तर सर्वांनाच माहिती आहे .पण कधी कोणाचा मनात प्रश्न आला का या सर्व मूलभूत गरजा आहेत का पूर्ण आपल्या लांजा राजापूर तालुक्यात .कसा येणार प्रश्न मनात कारणं आपण येवडा विचार करत नाही आपले कसे ना मी आणि
माझा कुटुंब बाकी आपल्या ल काही करायचे कोणत्या सुविधा आहेत की नाही .
सर्वात मोठी चूक कोणती असेल ना आपली तर आपण स्वतः पलिकडे जाऊन कधी आपल्या आजूबजूला काही झाले आहे या कडे लक्ष देत नाही ना कधी विचार करत आणि कोणी येऊन काही चांगले करत असेल तर त्याला बोलून मोकळे आला मोठा समाजसेवा करणारा .कधी बदलणार आपले विचार आणि किती दिवस दुसऱ्यांना नाव ठेवत वेळ वाया घालवणार .
लांजा राजापूर तालुका १००% स्वयंपूर्ण होऊ शकते . त्या साठी गरज आहे ती एकजूटीची आपल्या मध्ये असलेला राग, अहंकार , हिंसा ,दे्ष या गोष्टींचा वापर दुसऱ्याला त्रास न देता स्वतः मध्ये बदल करण्यात वापरले पाहिजे,
जिंकणारा जिंकतोच , पण काही शिकवितो !
कठोर मेहनतीला म्हणे , काहीच पर्याय नसतो …
आज एका नदीच्या नावाने ओळखली जाणारी संघटना म्हणजे मुचकुंदी परिसर विभाग संघ लांजा राजापूर ह्या संघटनेच्यावतीने नुसते पुलाचेच काम नाही तर आरोग्य , शिक्षण रोजगार आणि लांजा राजापूर तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला स्वतः ची एक नवीन ओळख निर्माण करण्यासाठी अध्यक्ष विजय भगते आणि त्यांचा सोबत असणारे इतर सदस्य यांनी हे व्यासपीठ मिळवून दिले आहे आपल्या सर्वांन साठी .
स्वराज्य स्वप्न पाहिले , स्वयंभूची शपथ घेऊनी
सदस्य जमवले साथी , नवप्रेरणा चेतवूनी …
लांजा राजापूर तालुक्या स्वयं पूर्ण होण्याचे जे स्वप्न आज विजय भगते साहेब यांनी पाहिले ते पूर्ण करण्यासाठी आज त्यांनी पुढाकार घेतला आहे त्यात आपल्या प्रत्येक नागरिकाचां सहभाग असायला हवा असेच मी म्हणेन
आपण जे वाडी वाडी मध्ये गट बाजी करून जे काही वाद करत असतो ते न करता सर्वांनी एकत्र येऊन माझा गाव कसे सुंदर होईल या कडे लक्ष दिले पाहिजे आज जगभरात जी आपली ओळख आहे भारतीय म्हणजे खेकड्या सारखे वगणारे आता हे थांबले पाहिजे ,एक मेकास साथ देऊन नक्कीच आपण लांजा राजापूर तालुक्यातील विकास करू शकतो . या साठी एकजूट असणे फार गरजेचे आहे व विचार ही सकारात्मक हवेत…
विचारांचं सामथ्र्य फार मोठं असतं. असं म्हटलं जातं की, विचारांनीच माणूस घडतो. सकारात्मक विचार करणाऱ्यांची प्रगती लवकर होताना दिसते.
रोजगार ची 100 % समस्या दूर होऊ शकते :-
भारत म्हणजे शेतीप्रधान देश असे मानले जाते ,आणि त्यात आपल्या कोकणात तर खूप काही गावनुसार पीक घेतले जाते,तसेच लांजा राजापूर तालुक्यात तर सद्या तरी काजू च उत्पादन खूप छान प्रकारे होते ,हे काजू आपण पर प्रांतियाना विकतो त्या पेक्षा जर सहकार कायद्या अंतर्गत एक दोन्ही तालुक्याच्या मध्य स्थानी एक फॅक्टरी काढली. तर बहुधाशी लोकांना रोजगार मिळू शकतो.
तसेच आपल्या इकडे लांजा राजापूर तालुक्यातील बजार पेट मध्ये जो भाजीपाला येतो तो कोल्हापूर मधून येतो म्हणजे घाटावरून त्यापेक्षा आपण आपल्या इकडे जर योग्य मार्गदर्शन घेऊन तंत्रज्ञान विकसित केले तर भाजीपला ही आपलाच आणि मार्केट ही आपलेच या मुळे दोन गोष्टी होऊ शकतात त्या म्हणजे आपल्या च लोकांना रोजगार मिळेल आणि एक स्वतःच स्वतःचा व्यवसाय होऊ शकतो .अजुन एक रोजगार साठी पर्याय म्हणजे आपल्या इकडे खूप असे काही स्थान आहेत ज्यांचा वापर भविष्यात पर्यटन व्यवसाय म्हणून ही करू शकतो , उदांरणार्थ सवत कडा,
जर रोजगार मध्ये आपण सक्षम झालो की मग सहज शिक्षण आरोग्य या गोष्टी पूर्ण होई शकतात
शिक्षण :-
आपल्या दोन्ही तालुक्यात बऱ्या पैकी महाविद्यालय परिसरात आहेत पण कमी आहे ती मेडिकल कॉलेज ची आणि त्या साठी संघटना प्रयत्न करतेय आहे म्हणा पण हे होऊ शकते जर आपण सर्व एकत्र येऊन सरकार कडे मागणी केली तर ..
बोलके करण्यास हवे असते संभाषण
आदरासाठी हवे असते आश्वासन
योग्य दिशा मिळवण्यासाठी आवशक आहे ते मार्गर्शन…
मेडिकल कॉलेज झाले तर आपल्याच तालुक्यातील कोणी ना कोणी तरी डॉक्टर होईलच जी स्वप्न आताची पिढी बघत आहे..
आरोग्य सुविधा सक्षम करणे …
शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्टिने व्यवस्थित आणि रोगमुक्त असण्याची अवस्था म्हणजेच आरोग्य होय.
आरोग्य सुविधा सक्षम असणे म्हणजे दवाखान्यात योग्य ती यंत्रणा सज्ज असणे तसेच तिथे डॉक्टर नर्स या बाकी कर्मचारी गरजे नुसार असावेत तसेच प्रत्येक गावच्या मध्यस्थानी एक प्राथमिक उपचार केंद्र असावे .
शेवटी एकच सांगेन की स्वयंपूर्ण च स्वप्न पूर्ण करणे आपल्या सर्वांचा हातात आहेत आणि त्या साठी तीन गोष्टी सक्षम असणे ही काला ची गरज आहे….आरोग्य ,शिक्षण रोजगार…चला तर मग येऊ एकत्र आणि एकजुटीने करू विकास..
प्रतिक्षा चव्हाण